दाढी-मिशीवाला नवरा हवा अशी कित्येक महिलांची इच्छा असते. पण कधी दाढी-मिशीवाली बायको पाहिली आहे का? एका पत्नीने आपल्या पतीसोबत दाढी-मिशी वाढवली. या दाढी-मिशीवालं कपल चर्चेत आलं आहे.
नताली आणि एरॉन अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनातील हे कपल जगभर फिरून दाढी-मिशीच्या स्पर्धेत भाग घेतं. व्हिसर्क वॉर्स नावाचा एक टीव्ही शो पाहिल्यानंतर 2014 सालापासून त्यांनी स्पर्धेत भाग घ्यायला सुरूवात केली.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दाढी-मिशीच्या बाबतीत नताला एरॉनवर भारी पडते. बऱ्याच स्पर्धेत ती पहिली आहे आहे. तर तिचा नवरा एरॉन दुसरा किंवा इतर स्थानावर राहिला. आतापर्यंत ती 170 स्पर्धा जिंकली आहे.
एरॉनची दाढी 27 इंच लांब आहे. नतालाची दाढी-मिशी पाहिली तर ती थोडी विचित्र आहे. तिने सांगित्यानुसार ही तिची नैसर्गिक दाढी मिशी नाही तर तिने त्या फेक आहेत. म्हणजे तिने डिझाइन करून घेतल्या आहेत.
दाढी-मिशीच्या स्पर्धेबाबत सांगताना नताली म्हणाली, या स्पर्धेत रिअल आणि क्रिएटिव्ह असे दोन प्रकार असतात. ती क्रिएटीव्हमध्ये भाग घेते आणि एरॉन रिअलमध्ये.
क्रिएटीव्हमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना दाढी-मिशीचा आकार देऊन क्रिएटीव्हीटी दाखवली जाते. नतालीने आपली पहिली दाढी स्क्रॅपने बनवली होती. (सर्व फोटो सौजन्य - Aaron Johnston/SWNS)