आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे सातत्यानं अवघड काम असो किंवा सोप जुगाड करून पूर्ण करत असतात. आपल्याकडे जुगाडाशिवाय कोणतं काम पूर्ण होत नाही असंही मस्करीत म्हटलं जातं. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनदरम्यान असे काही अजब जुगाड करण्यात आले. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साधारण मोठ्या गाडीत एसीची हवा फक्त पुढच्या माणसांनाच लागते त्यामुळे मागच्या सीटवरचे प्रवासी उकाड्यानं हैराण होतात. त्यासाठी करण्यात आलेला हा अजब जुगाड पाहा.
कोरोना व्हायरसमुळे जीम बंद आहेत त्यामुळे व्यायम कसा करायचा हा प्रश्न पडलेल्या तरुणानं हा जुगाड केला आहे. (फोटो- ट्वीटर jeetselal)
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यवश्यक असलेलं दूध विक्रेत्यानं ग्राहकांसाठी केलेला हा अजब जुगाड. यामुळे सोशल डिस्टन्सचं पालनही होत आहे. (फोटो- ट्वीटर @aniket)
घरात शॉवर खराब झाला पण लॉकडाऊनमुळे तो दुरुस्त करता येत नाही अशावेळी शॉवरखाली अंघोळ करण्यासाठी खास indian jugaad करण्यात आला. (फोटो- फेसबुक)
मोठ्या घरांमध्ये पूल गेमसाठी मोठे टेबल असतात पण ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत त्यानंतर घरातच पूल गेमचा कोर्ट तयार केला आहे. (फोटो @abhi11984)
ही इमारत आहे की आणखी काही हे त्या इमारत बांधणाऱ्यालाच माहीत. या इमारतीमध्ये जाण्यासाठी प्रवेश कुठून आहे हे देखील समजत नाही. जे काही आहे ते अजब आहे.
मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वरून प्लॅस्टीकची पिशवी घातली आहे.
सोशल डिस्टन्सचं पालन करण्यासाठी बाजारात बूट आले आहेत. या बुटांची लांबी जास्त असल्यानं रस्त्यातून चालत जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपणच होईल असं सांगण्यात आलं आहे. हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
मास्क शिवाय पेट्रोल मिळणार नाही हा नियम पेट्रोल पंपावर केल्यानंतर एका तरुणानं तर मास्क विसरला म्हणून खास भाजीच्या पिशवीचा मास्क केला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरतो पण या मास्कचा चार्जिंग स्टॅन्ड म्हणूनही वापर केला जात आहे.