उन्हाळा सुरु झाला असून उन्हाची झळ जाणवायला सुरुवात झाली आहे.
उन्हाळा जवळ येताच अनेकजण थंड प्येय घेण्यास सुरुवात करतात.
उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंग्स पित असतात.
मात्र अशा कोल्डिंग्स घेणं शरीरासाठी किती हानिकारक ठरु शकतात, याचा कधी विचार केलाय का?
बाजारत गेल्यावर आपण हमखास कोल्ड्रिंग्स पितात. मात्र यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील सुगर वाढू शकते.
कोल्ड्रिंक्समध्ये कार्बन डाय ऑक्साईड आढळतो, जे उष्णतेमुळे पोटात गेल्यावर गॅसमध्ये बदलू लागते. यामुळेच काहींना कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर लगेच ढेकर येतात.
कोल्ड्रिंग्सचे अधिक सेवन केल्यास पोटाचे विकार होतात.
कोल्ड्रिंक्स प्यायल्याने मधुमेह किंवा पचनाच्या समस्या तर होतातच पण त्यामुळे आपली किडनीही कमकुवत होते.