दारूचं व्यसन सोडवण्यासाठी बरेच उपाय केले जातात. पण काही केल्या दारूचं व्यसन सुटता सुटत नाही. तर यावर आता सोपा फॉर्म्युला आला आहे.
काय असते इन्फिनिटी बॉटल?
हुनान ब्रेन हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. फक्त 5 मिनिटांचं हे ऑपरेशन आहे. ज्यात या व्यक्तीच्या शरीरात एक चीप बसवण्यात आली.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये एक अशी चिप तयार करण्यात आली आहे, जी दारूचं व्यसन सोडवते. या चिपची वैधता 5 महिने आहे.
इंटरनॅशन नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे उपाध्यक्ष हाओ वेई म्हणाले, ही चिप शरीरात इम्प्लांट केल्यानंतर 5 महिने दारूची तलब येणार नाही. इम्प्लांट झाल्यानंतर नॅलट्रेक्सॉन रिलीज होईल. जे कोणतंही व्यसन सोडवण्याच्या उपचारात वापरलं जातं. (सर्व फोटो प्रतीकात्मक)