आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणार्या व्यक्तीला आयुष्यात कधीही संकट येत नाही. पुरुषाची कोणती क्षमता स्त्रीला संतुष्ट करते हे चाणक्य यांनी सांगितलं आहे.
जबाबदार - चाणक्य नीतीमध्ये असं म्हटले आहे की पुरुषांनी नेहमी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. असे पुरुष त्यांच्या पत्नीला प्रिय असतात.
दक्षता - माणसाने कुत्र्याप्रमाणे नेहमी आणि प्रत्येक परिस्थितीत सावध असलं पाहिजे. पत्नी आणि कुटुंबासाठी आणि शत्रूंपासून देखील आपल्या कर्तव्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा गुणांचा पती स्त्रियांना आवडतो.
निष्ठा - कुत्रा ज्या प्रकारे निष्ठावान असतो, त्याचप्रमाणे पुरुषांनीही त्यांच्या पत्नीशी एकनिष्ठ असले पाहिजे. जे पुरुष कोणत्याही अनोळखी स्त्रीला पाहून डगमगत नाहीत, असे पुरुष महिलांना आवडतात.
शौर्य - श्वान शूर आणि निर्भय प्राणी मानले जातात. कुत्र्याप्रमाणे पुरुषांनीही निर्भय असले पाहिजे, जे गरजेच्या वेळी आपल्या कुटुंबासाठी आणि पत्नीसाठी जीव धोक्यात घालण्यापासून मागे हटत नाहीत.
समाधान - आचार्य चाणक्य म्हणतात की पुरुषांनी मेहनती असावं. कुत्रा जे मिळेल त्यात समाधानी असतो, त्याचप्रमाणे माणसाने जे काही कमवलं, त्यात समाधानी असलं पाहिजे. पुरुषांना या गुणामुळे यश मिळतं.