तशी अंघोळ तर आपण दररोज सकाळी आणि काही लोक दिवसातून दोनदाही करतात. पण काही विशिष्ट कामं केल्यानंतर अंघोळ करायला हवी
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये अंघोळ कधी करावी, याचा उल्लेख केला आहे. तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि। तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।। असा हा श्लोक आहे.
चाणक्य यांच्या श्लोकानुसार शरीराची तेलाने मालिश केल्यानंतर लगेच अंघोळ गरजेची आहे.
केस कापल्यानंतर अंघोळ करा, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं.
अंत्यसंस्कारावरून आल्यावर अंघोळ करायला हवी.
महिला-पुरुषांनी संबंध बनवल्यानंतर अंघोळ करावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला. (सर्व फोटो - Canva)