NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / चर्चा तर होणारच! कपलने केलं असं लग्न की शाही विवाह, डेस्टिनेशन वेडिंगही फेल; पाहा WEDDING PHOTO

चर्चा तर होणारच! कपलने केलं असं लग्न की शाही विवाह, डेस्टिनेशन वेडिंगही फेल; पाहा WEDDING PHOTO

कधीच पाहिला नसलेल्या अशा या अनोख्या लग्नसोहळ्याची चर्चा सर्वत्र होते आहे.

18

कोर्ट मॅरेजपासून डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत तुम्ही बरीच लग्न पाहिली असतील. पण सध्या अशा लग्नाची चर्चा होते आहे, जसं तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसेल.

28

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधील दाम्पत्याने अशा पद्धतीने लग्न केलं आहे, की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

38

रंग महल गार्डनमध्ये मंगळवारी हा अनोखा असा विवाहसोहळा संपन्न झाला. 

48

शंखनाद आणि वेद, मंत्रोच्चाराने विवाहाचा शुभारंभ झाला. वरमाला घालतानाही शंख वाजवण्यात आला, मंत्रोच्चार करण्यात आले.

58

बँडबाजा, डीजेऐवजी या लग्नात धार्मिक, भक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.

68

या लग्नात साधूसंतांनाही बोलावण्यात आलं होतं, ज्यांनी या वधूवराला आशीर्वाद दिला.

78

या लग्नात आणखी एक खास होतं ते म्हणजे गोमातेचं पूजन. वधू-वराने गाईला आपल्या हाताने खाऊ घातलं. गोमातेचं पूजन करून हा विवाह संपन्न झाला.

88

एकंदर या लग्नात भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. इतर लग्नांपेक्षा खरंच सुंदर असा हा विवाहसोहळा आहे.

  • FIRST PUBLISHED :