बस असो, ट्रेन असो वा प्लेन. बहुतेक प्रवाशांना विंडो सीटच हवी असते. विमान प्रवास करताना तर विंडो सीट हवीच. जेणेकरून आकाश आणि जमिनीवर अद्भुत असं दृश्य पाहता येईल.
पण खरंतर फ्लाइटमध्ये फक्त मनमोहक दृश्य पाहण्यासाठी विंडो सीटचा विचार करून चालणार नाही. विमानातील सीट्स निवडणंही महत्त्वाचा आहे. कारण काही सीट्स बेस्ट आणि काही खूपच धोकादायक असतात.
डेली स्टारच्या वृत्तानुसार पॅट्रिक स्मिथ नावाच्या एअरलाइन पायलटने ई-शोर वेबसाइटशी बोलताना विमानातील सीट्स निवडताना काय काळजी घ्यायची हा सल्ला दिला आहे.
विमानातील अशी सीट जिथं टर्ब्युलन्स जास्त असतं. हवामान खराब झाल्यानंतर विमान हलू लागतं, यालाच टर्ब्युलन्स म्हणतात.
जर फ्लाइटमध्ये भरपूर जागा रिकाम्या असतील आणि तुमच्याकडे सीट निवडीचा पर्याय असेल, तर ही सीट तुम्ही बुक करू नका. सर्वात आरामदायी जागा मिळवण्यासाठी वेळेआधीच बुकिंग करा.
आता विमानातील ती कोणती सीट जी बुक करू नये. तर ती सीट आहे टेल सीट. म्हणजे विमानातील शेवटची सीट.
रोझी नावाच्या फ्लाइट अटेंडनेही या सीटच्या मागे बाथरूम असल्याचं सांगत. लोकांनी पुढच्या सीटची निवड करावी असं म्हटलं आहे. तिने आपण रो-5 निवडू असं सांगितलं आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)