तुम्ही अगदी हजारांपासून ते लाखो रुपये किमतीचे श्वान पाहिले असतील असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या डॉगची किंमत काही हजारो, काही लाख नाही तर तब्बल 20 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.
हैदराबादच्या बंगळुरूतील सतीश एस नावाच्या व्यक्तीकडे हा श्वान आहे. डॉग ब्रीडर असलेल्या सतीशने हैदराबादच्या एका डॉग ब्रीडरकडून हा श्वान खरेदी केला होता.
हा श्वान कॉकेशियन शेफर्ड या दुर्मिळ प्रजातीचा आहे. सतीश यांनी त्याचं नाव कॅडबॉम्स हैदर असं ठेवलं आहे. कॅडबॉम्स फक्त दीड वर्षांचा आहे पण तरी इतर मोठ्या श्वानांपेक्षा तो कितीतरी मोठा वाटतो.
त्याचं वजन 100 किलोपेक्षाही जास्त आहे. डोकं 38 इंच आणि खांद्याची लांबी 34 इंच आहे. त्याचे पाय दोन लीटरच्या पेप्सीच्या बाटलीइतका मोठा आहे.
या श्वानाने त्रिवेंद्रम केनेल क्लब स्पर्धेत भाग घेतला आणि अनेक पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट श्वानाच्या या जातीसाठी कॉकेशियन शेफर्डने एकूण 32 पदके जिंकली आहेत. (सर्व फोटो सौजन्य - Instagram/satishcadaboms)