तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील कमारीपल्ली मंडलच्या येरगटला गावातील जोडपं सागर आणि रावली या दोघांचं हे बाळ आहे. रावलीला प्रसुती वेदना झाल्यानंतर तिला मेटपल्ली सरकारी रुग्णालयात नेलं, पण डॉक्टर नसल्याने निजामाबादच्या कोरुटला सरकारी रुग्णालयात नेलं.
तिथे रावलीने सामान्य प्रसूतीमध्ये एका मुलाला जन्म दिला. पण तिच्या बाळाला पाहून डॉक्टरांसह सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्या बाळाचे हातपाय असे होते की पाहून डॉक्टरही शॉक झाले.
माणसाला सामान्यत: हातापायाची मिळून 20 बोटं असतात. काही जणांच्या हाताला किंवा पायाला एखाद बोट जास्त असतं. पण या बाळाला तब्बल 24 बोटं आहेत. त्याच्या दोन्ही हाताला आणि दोन्ही पायाला एक जास्तीचं बोट आहे.
अलीकडच्या काळातील पहिलाच प्रकार असल्याचं डॉक्टर म्हणाले. बाळाची प्रकृती चांगली आहे आणि ते ठणठणीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
न्यूज 18 ने संपर्क साधला तेव्हा या बाळाच्या पालकांनी सांगितले की, असाधारण बाळाचा जन्म ही त्यांच्यासाठी देवाची भेट आहे. रावली म्हणाली की ती त्याला राजकुमाराप्रमाणे ठेवेल.