NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / VIRAL NEWS : गाढवासह असे 8 प्राणी जे उभ्या उभ्याच झोपतात; पण आपल्यासारखा त्यांचा तोल का जात नाही?

VIRAL NEWS : गाढवासह असे 8 प्राणी जे उभ्या उभ्याच झोपतात; पण आपल्यासारखा त्यांचा तोल का जात नाही?

या प्राण्यांकडे अशी क्षमता आहे, ज्यामुळे ते उभ्या उभ्याही झोपू शकतात.

112

खूप थकलेलं असताना बस किंवा ट्रेनमध्ये एखाद डुलकी तुम्ही काढलीच असेल. पण असं बराच वेळ झोपणं शक्यच नाही. उभ्या उभ्या झोपल्याने तोल जातोच आणि शांत, नीट झोपही लागत नाही.

212

शांत झोपेसोठी खरंतर आपल्याला हातपाय पसरता येतील असा बेड, उशी आणि पांघरूण हवं असतं. पण असे काही प्राणी जे उभ्या उभ्या अगदी शांत आणि नीट झोपतात.

312

सामान्यपणे तुम्ही रस्त्यात बऱ्याच गाढवांना उभं राहून झोप काढताना पाहिलं असेल. 

412

गाढवांप्रमाणे घोडाही उभं राहून छानशी डुलकी घेतो. पण याचा अर्थ तो रात्रभरही तसाच झोपतो असं नाही. रात्री तो जमिनीवर आडवा होऊनच झोपतो.

512

उंच मान असलेला जिराफ, याची झोप कमी असते. शिवाय उंचीमुळे खाली जमिनीवर आडवं झोपून उठण्यात अडचण येते, त्यामुळेच तोसुद्धा उभ्यानेच झोपतो. 

612

जिराफाप्रमाणे उंच असणारा उंटही उभ्याने झोपतो. तुम्ही उंटांना तसं आरामात झोपताना पाहिलं असेल पण ते उभं राहूनही झोपू शकतात. 

712

झेब्र्यालाही उभ्या उभ्या झोप लागते.

812

हरिणही उभं राहूनच झोपू शकतो.

912

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हत्तीही उभ्या उभ्या झोपतात. पाळीव हत्ती जमिनीवर आडवे होऊन झोपतात. पण जंगली हत्ती मात्र उभं राहूनच झोप काढतात. हत्ती दिवसातून फक्त दोन तास झोपतात.

1012

हत्तींप्रमाणे शरीराने अवाढव्य गेंडाही उभ्यानेच झोप काढू शकतो.

1112

शांत निवांत बसणारी गायही उभं राहून झोपू शकते.

1212

या प्राण्यांमध्ये स्थिर उभं राहण्याची आणि गुरुत्वाकर्षणालाही टक्कर देण्याची क्षमता असते. त्यामुळेच ते उभ्या उभ्या झोपू शकतात. (सर्व फोटो - Canva)

  • FIRST PUBLISHED :