नुकतेच उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात उंदराच्या मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात उंदराचा मृत्यू हा मुख्य विषय नसून प्राण्यांची क्रूरपणे केलेली हत्या हा विषय आहे.
वास्तविक, आजकाल प्राण्यांच्या क्रूरते घटना वाढल्या आहेत. नुकतेच बदायूं जिल्ह्यात एका तरुणावर उंदीर मारल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
सध्या काही लोक मुद्दामहून प्राण्यांशी क्रूरपणे वागत असतात. परंतु आता हे केल्यास लोकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
रस्त्यावरून चालताना कुत्रे, मांजर, गाय इत्यादी प्राण्यांशी लोक क्रूरपणे वागतात, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. पण जाणून बुजून नकळत असे केल्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.
याबाबत news18 ने काही तज्ञांशी चर्चा केली यावेळी ते म्हणाले की, प्राण्यांना लाथा मारणे, दगड मारणे किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार करणे हा प्राणी क्रूरता कायदा, 1960 च्या कलम 11 अंतर्गत गुन्हा आहे. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला जास्तीत जास्त 3 वर्षे तुरुंगवास आणि कमाल 2000 रुपये दंड भरावा लागू शकतो.
उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्हा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे. अशा स्थितीत वन्यप्राण्यांवर क्रुरतेने वागल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
वन अधिनियम 1972 अंतर्गत आरोपीवर कारवाई होऊ शकते. याबाबत लोकांनी प्राण्यांबद्दलचे प्रेम वाढवले पाहिजे. निसर्गाचे संवर्धन करण्याचा हाच खरा मार्ग असल्याचे सांगण्यात आले.