जगात अशी अनेक लोक आहेत ज्यांना कायम तरुण रहायचं आहे. अशाच काही लोकांनी मिळून एक ग्रुप तयार केलाय.
ज्यांना वृद्ध व्हायचं नाही अशा लोकांनी मिळून 'जुजालू' नावाचा वेगळा एरिया बनवला आहे. इथे ते कसं तरुण रहायचं या मुद्द्यांवर काम करणार.
युरोपमधील बाल्कन देश मॉन्टेनेग्रोच्या लुस्टिका बे एरियामध्ये सुमारे 800 लोक जमले होते. यासाठी एक आठवड्याभराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे अनेक मोठमोठे लोक उपस्थित झाले. या ठिकाणी दीर्घायुष्यासंबंधीत काही गोष्टींवर कोणत्याही अडथळ्याविषयी बोलण्यात आलं.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे संशोधन विद्यार्थी मॅक्स अनफ्रीड म्हणतात की जुजालू हे असे क्षेत्र आहे जिथे बायोटेक कंपन्यांना कर सवलत, बायोहॅकिंग आणि क्लिनिकल चाचण्यांपासून सवलत दिली जाईल. म्हणजेच, लोक नियामक पद्धतीने सुरक्षित किंवा प्रभावी सिद्ध न झालेली औषधे वापरु शकतील.
या लोकांनी घेतलेला पुढाकार प्रभावी ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे.