Oymyakon - रशियातील हे गाव जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे तापमान -60 अंशांवर येते. असं असूनही येथे सुमारे 550 लोक राहतात. याठिकाणी अनेकदा बर्फही पडतो.
वर्खोयन्स्क - उत्तर रशियामध्ये असलेल्या वर्खोयन्स्कमध्ये नेहमीच बर्फ पडतो. जानेवारीच्या हंगामात, येथील सरासरी तापमान -50 अंश सेल्सिअसच्या खाली जाते.
बॅरो अलास्का - अमेरिकेतील हे अतिशय सुंदर शहर उत्कियाग्विक या नावानेही ओळखले जाते. येथे थंड हंगाम बराच काळ टिकतो आणि तापमान -30 अंश सेल्सिअसच्या खाली जाते.
यलोनाइफ - कॅनडाच्या वायव्य प्रदेशाची राजधानी समजले जाणारे शहर हे दीर्घकाळ राहणाऱ्या थंडीसाठी प्रसिद्ध आहे. इथे उन्हाळ्यातही तापमान खूप खाली जाते. थंडीत ते -40 अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
नोरिल्स्क - रशियामध्ये असलेल्या या सायबेरिया शहरात थंडीच्या दिवसात किमान तापमान -61 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. तर येथील सरासरी तापमानही उणे 10 अंश सेल्सिअस राहते.
युरेका - उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे, या कॅनेडियन शहरातील किमान तापमान बहुतेक वेळा -18 अंश सेल्सिअसच्या खाली राहते. थंडीच्या दिवसात ते -55 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते.
अॅमंडसेन स्कॉट स्टेशन - दक्षिण ध्रुवाचा सर्वोच्च बिंदू. येथे प्रत्येक ऋतूत तापमान मायनसमध्ये राहते. थंडीच्या दिवसात तापमान -70 अंश सेल्सिअसच्याही खाली जाते.
इंटरनॅशनल फॉल्स, मिनेसोटा - अमेरिकेचा हा भाग जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. त्याच्या किमान तापमानामुळे, या ठिकाणाला 'आइसबॉक्स ऑफ द नेशन' ही पदवी देखील मिळाली आहे.