NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / महाभयंकर सापासह 2 वर्षाच्या चिमुरड्याचा खेळ, शेपटी पकडून नेलं ओढत... पाहा PHOTO

महाभयंकर सापासह 2 वर्षाच्या चिमुरड्याचा खेळ, शेपटी पकडून नेलं ओढत... पाहा PHOTO

साप पाहून एखाद्याच्या घाबरून भंबेरी उडेल. अशावेळी अवघ्या 2 वर्षांचा चिमुरडा महाकाय सापाबरोबर निर्भयपणे खेळताना दिसला तर आश्चर्यच वाटेल. मात्र ऑस्ट्रेलियातील एका चिमुरड्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

19

मॅट राईट (Matt Wright) नावाची व्यक्ती या चिमुरड्याचे वडील आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये क्रॉक रँगलर म्हणून प्रसिद्ध (Australia's Croc Wrangler) आहे. बोंजो नावाचा हा लहान मुलगा ज्या प्रकारे सापाला शेपटीने पकडून ओढत आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे, मात्र त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या साहसाचं कौतुक वाटतंय

29

मॅट राईट बोंजोला 2 मीटर लांब साप कसा नियंत्रणात ठेवावा यासाठी सर्व युक्त्या सांगत आहेत.

39

साप कधी पकडावा आणि कधी खेचावा हेही ते त्याला सांगतात. तो शेपटीला धरून मोठ्या आत्मविश्वासाने तो खेचताना दिसतो.

49

मॅट राईट यांनी स्वतः मगरी पकडण्यात प्रभुत्व मिळवले आहे आणि ते 20 वर्षांपासून नॉर्दर्न टेरिटरीमध्ये हेच काम करत आहे. ते त्यांच्या 2 वर्षांचा मुलगा बोंजो याला प्राण्यांशी निर्भयपणे वागण्याचे प्रशिक्षण देत आहे. हे बाळ बागेत खेळताना 2 मीटर लांब सापाची शेपटी खेचत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील

59

Daily Mail च्या अहवालानुसार, हा व्हिडीओ या चिमुरड्याच्या वडिलांनीच बनवला आहे. मॅट यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. या व्हिडीओत महाभयंकर सापासह हा 2 वर्षाच्या चिमुरडा खेळ करताना दिसत आहे. @mattwright या इन्स्टा अकाउंटवर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.

69

बोंजोचा हा साहसी व्हिडीओ विशेष वेगाने व्हायरल होत आहे. या एवढ्याशा मुलाची समज आणि वेळेवर आज्ञेचं पालन करण्याची गुणवत्ता पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत.

79

बोंजोचे याआधीही काही फोटो व्हायरल झाले आहेत. हा गोंडस चिमुरडा एवढ्या मोठ्या सापाला कसा काय पकडतोय याचंच सर्वांना आश्चर्य वाटत आहे

89

बोंजोचे पालक त्याला प्राण्यांशी कसे वागावे हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. डेली मेलशी बोलताना मॅट राईट म्हणाले की, त्यांच्या मुलासाठी कधी धोका असू शकतो आणि कधी तो परिस्थिती सहजपणे हाताळू शकतो हे त्यांना योग्यपणे माहित आहे. जर एखाद्याला त्याच्या मर्यादा माहीत असतील तर प्राणी धोकादायक नसतात.

99

मॅट राईट स्वत: मगरींना पकडतात, त्यांना स्थानांतरित करतात. अशावेळी ते बोंजोला निर्भयपणे सापांवर नियंत्रण मिळवण्यास शिकवत आहेत. त्यांना बघून असे वाटेल की सापांसह जगणे सोपे आहे. मॅट यांनी बोंजोला सापांपासून कधी दूर राहायचे हे देखील शिकवले आहे, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये.

  • FIRST PUBLISHED :