जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी या माणसानं पाण्याच्या टाकीचं रुपांतरच मास्कमध्ये केलं. हा फोटो फिलिपीन्सच्या मनिला भागातला आहे.
चीनच्या वुहान शहरात सुपर मार्केटमध्ये खरेदी करुन बाहेर पडत असलेल्या माणसानं घातलेला हा जगावेगळा मास्क.
कम्पालामध्ये पर्यायी मास्क घातलेला एक माणूस फोटोसाठी पोझ देताना.
पेटेर शेजारच्या कराकस येथे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी बाजारात खरेदी करणाऱ्या एका महिलेनं घातलेला फेस मास्क.
कोरोना व्हायरसच्या उद्रेका दरम्यान बीजिंगमधील ऑफिस इमारतींच्या बाहेर फेस मास्क घातलेली एक महिला.
कोरोना व्हायरपासून बाचावात्मक उपाय म्हणून संरक्षक गियर घातलेला एक प्रवासी. बँकॉकमधील चाओ फ्रायया नदीवर प्रवासी बोटमध्ये चढला.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे दोन महिन्यांचं लॉकडाउन संपल्यावर वुहान शहरातील रेल्वे स्थानकातील कर्मचारी हातवारे करुन प्रवाशांना समजावताना.
थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांताच्या नारातीवाटमधील सकाळच्या मार्केटमध्ये सीफूड खरेदीसाठी आलेल्या महिलेनं कोरोनापासून बचाव करण्यासाठी घातलेला मास्क.
भारत सरकारच्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान फेसमास्क आणि गॉगल्स घातलेला एक माणूस श्रीनगरच्या रस्त्यावर उभा आहे.
अर्धवट चेहरा असलेला फेसमास्क घातलेली एक महिला. (संकलन : मेघा जेठे.)