NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / PHOTOS: तुर्कस्तान-सीरियातील भूकंपानंतर लोकांमध्ये सरकारविरोधात संताप; काय आहे कारण?

PHOTOS: तुर्कस्तान-सीरियातील भूकंपानंतर लोकांमध्ये सरकारविरोधात संताप; काय आहे कारण?

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे बराच विध्वंस झाला होता. रविवारी मृतांचा आकडा 46 हजारांवर गेला. येथील जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. (सर्व छायाचित्रे रॉयटर्स)

16

भूकंपानंतर अद्याप किती लोक बेपत्ता आहेत हे तुर्कस्तान किंवा सीरियाने सांगितलेले नाही. तुर्कीमधील लोक अजूनही त्यांच्या नातेवाईकांच्या परतण्याची वाट पाहत आहेत. अशा कुटुंबात सरकारविरोधात तीव्र संताप आहे. भ्रष्ट बांधकाम पद्धती आणि सदोष शहरी विकासाला ते विनाशासाठी जबाबदार धरत आहेत.

26

येथील हजारो घरे आणि दुकाने ढिगाऱ्यात बदलली आहेत. लोकांचा व्यवसाय संपला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. भूकंपानंतर सरकारचा प्रतिसाद आणि तयारी विरोधात राग वाढत आहे. तुर्कस्तानमधील अनेक लोक नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारने बचावकार्य अत्यंत संथ गतीने केले आहे, असे लोकांना वाटते.

36

यासोबतच बचाव पथकाला अनेक भागात पोहोचण्यास वेळ लागल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे. भूकंप आणि आफ्टरशॉकमुळे प्रभावित क्षेत्र 10 प्रांतांमध्ये पसरले आहे. भूकंपामुळे येथील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे बचाव पथक योग्य वेळी पोहोचू शकले नाही. याशिवाय पोहोचले तरी त्यांच्याकडे फार कमी संसाधने होती.

46

तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी प्रतिसादात 'उणिवा' असल्याचे मान्य केले. पण, आपत्ती 'नियती' असल्याचे देखील म्हटलं आहे. इमारतींच्या निकृष्ट बांधकामावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उच्च मृत्यू दरासाठी निकृष्ट बांधकाम कारणीभूत असल्याचे अनेकांचे मत आहे. तुर्कीचे माजी मुत्सद्दी इमदत ओनर म्हणाले की त्यांचा विश्वास आहे की सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या व्हिडिओने विशेषतः लोकांच्या संतापाला हातभार लावला.

56

ट्विटरवर 13 लाख व्ह्यूज असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुर्कीचे परिवहन मंत्री आणि एर्दोगानच्या पक्षातील आणखी एक अधिकारी भूकंपामुळे सर्वात गंभीरपणे प्रभावित झालेल्या अद्यामनमधून पळून जात असल्याचे दाखवले आहे. तेव्हा संतप्त जमावाने त्यांच्यावर आरडाओरडा सुरू केला. लोकांनी अधिकाऱ्यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

66

निकृष्ट बांधकामावर, नुकसान झालेल्या इमारतींमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांसाठी सरकारने शंभरहून अधिक वॉरंट जारी केले आहेत. त्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे फुटेज तुर्की माध्यमांमध्ये प्रसारित केले जात आहे. 2018 च्या कायद्यानंतर कंत्राटदारांना अधिक सूट देण्यात आली.

  • FIRST PUBLISHED :