NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / Titan Submersible : टायटन पाणबुडीच्या समुद्रात चिंधड्या, 12,500 फूट खोलीतून अवशेष बाहेर, पहा PHOTOS

Titan Submersible : टायटन पाणबुडीच्या समुद्रात चिंधड्या, 12,500 फूट खोलीतून अवशेष बाहेर, पहा PHOTOS

Titan Submersible : 18 जूनला टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा खोल स्फोट झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश, प्रिन्स दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि समुद्रशास्त्रज्ञ पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा यात समावेश होता. पाणबुडीचे अवशेष अमेरिकन तटरक्षक दलाने शोधून काढले आहेत.

16

काही दशकांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली ओशनगेट कंपनीची टायटन पाणबुडी 8 जून रोजी संपर्क तुटल्याने समुद्रात बुडाली. पाचही प्रवासी अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. संपर्क तुटल्यानंतर बोटीच्या अवशेषांचा शोध सुरू होता. आज अमेरिकन कोस्ट गार्डला अखेर यश मिळाले. (एपी)

26

एपी या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचे अवशेष शोधून समुद्रकिनाऱ्यावर आणले जात आहेत. कॅनडातील सेंट जॉन्स बंदरात होरायझन आर्क्टिक जहाजातून बोटीचे अवशेष आणण्यात आले आहे. तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार टायटन पाणबुडीचा स्फोट समुद्राच्या आत प्रचंड दाबामुळे झाला. त्यामुळे सर्व प्रवासी ठार झाले. (एपी)

36

या पाणबुडीवर जगातील प्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि समुद्रशास्त्रज्ञ पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा समावेश होता. हे सर्व लोक अनेक दशकांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेले टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी गेले होते. (एपी)

46

समुद्रात बुडलेल्या टायटॅनिक पाणबुडीचे अवशेष टायटॅनिक जहाजापासून अवघ्या 1600 फूट अंतरावर सापडल्याचे अमेरिकन तटरक्षक दलाने सांगितले. बुडालेल्या टायटन पाणबुडीच्या शोध मोहिमेत अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमच्या तपास यंत्रणांचा सहभाग आहे. त्यांना बोटीचे अवशेष सापडले आहेत. (एपी)

56

कॅनेडियन जहाज होरायझन आर्क्टिकच्या मदतीने त्याचे अवशेष शोधण्यात आले. पाणबुडीचे तुकडे शोधण्यासाठी आरओव्ही (Remote Operated Vehicle) देखील घेण्यात आले. ROV कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्व आव्हाने असूनही आम्ही चोवीस तास काम करत आहोत. (एपी)

66

एका अहवालानुसार, टायटॅनिक जहाजाचे अवशेष समुद्रात 12,500 फूट खोलवर पडलेले आहेत. खोली इतकी आहे की जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफासारख्या 4 इमारती बसतील. सूर्यप्रकाश समुद्रात फक्त 660 फूट खोलीपर्यंत जाऊ शकतो. (एपी)

  • FIRST PUBLISHED :