NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / 57 वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने 31 वर्षे लहान तरुणीसोबत बांधली पाचवी लग्नगाठ

57 वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने 31 वर्षे लहान तरुणीसोबत बांधली पाचवी लग्नगाठ

पाचव्यांदा लग्न करणाऱ्या या अभिनेत्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे

15

हॉलीवूड चित्रपट घोस्ट रायडरचा अभिनेता निकोलस केज यांने पाचव्यांदा लग्न केलं आहे. 57 वर्षीय निकोलस केजने आपल्या 26 वर्षीय जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत लाल वेगास येथील Wynn Hotel मध्ये लग्न केलं.

25

कमी लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. PEOPLE मॅगेजीनसोबत बोलताना निकोलस केज म्हणाले की, हो हे खरं आहे आणि आम्ही दोघेही खूप खूष आहोत. निकोलस आणि रीकोच्या लग्नाचा खुलासा शुक्रवारी झाला.

35

तसं पाहता निकोलस केज आणि रीको शिबाटा यांनी 16 फेब्रुवारी रोजी लास वेगस येथे लग्न केलं होतं. हा दिवस निकोलससाठी खूप खास होता, ही तारीख निकोलसच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ निवडण्यात आली होती.फोटो साभार-The sun

45

निकोल, आणि रीको यांच्या लग्नातील पोशाखाबद्दल सांगायचं झालं तर रीको शिबाटाने लग्नात हँडमेड जपानी ब्रायडल कीमोने घातलं होतं, हा तीन लेयरचा कीमोने क्योटो लेबलचा होता. तर निकोलस केजने टॉम फोर्डने तयार केलेला टक्सीडो आपल्या स्पेशल दिवशी परिधान केला होता.

55

पीपलने निकोलस आणि रीकोच्या लग्नाच्या ठिकाणाचा फोटो शेअर केला आहे. लग्नानंतर छोटंसं सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं, ज्यात निकोलसची एक्स पत्नीदेखील सामील झाली होती.

  • FIRST PUBLISHED :