मध्य अमेरिकन देश असणाऱ्या एल साल्व्हाडोरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सर्फिंग चँपियन खेळाडू कॅथरिन डियाझ हर्नांडेज (Katherine Diaz Hernandez) हिचा वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य - कॅथरीन डियाझ हर्नांडेज इन्स्टाग्राम)
मीडिया अहवालांच्या मते कॅथरिनच्या डोक्यावर वीज कोसळली. स्थानिक वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कॅथरिन टुंको याठिकाणी सर्फिंग प्रॅक्टिससाठी गेली होती, मात्र याठिकाण वीज कोसळून तिचा मृत्यू झाला (फोटो सौजन्य - कॅथरीन डियाझ हर्नांडेज इन्स्टाग्राम)
त्याठिकाणी उपस्थित असणारे कॅथरिनचे मित्रमैत्रिणी आणि उपस्थितांनी लगेच रुग्णवाहिका बोलावून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टर या खेळाडूचे प्राण वाचवू शकले नाहीक. तिने हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला, तिचे शरीर देखील मोठ्या प्रमाणात जळले होते. (फोटो सौजन्य - कॅथरीन डियाझ हर्नांडेज इन्स्टाग्राम)
कॅथरिन तिच्या देशात होणाऱ्या ग्लोबल सर्फ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणार होती. तिचे लक्ष्य ऑलिंपिंक क्वालिफाय करणं हे होतं. टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा सर्फिंगचा समावेश करण्यात आला होता आणि तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.(फोटो सौजन्य - कॅथरीन डियाझ हर्नांडेज इन्स्टाग्राम)
कॅशरिन पेशाने शेफ होती. ती सकाळी खेळाची प्रॅक्टिस करत असे आणि संध्याकाळनंतर जेवण बनवण्याचे काम करत असे. कॅथरिनने साल्व्हाडोरकडून आयएसए वर्ल्ड सर्फिंग गेम्समध्ये देखील सहभाग घेतला होता. (फोटो सौजन्य - कॅथरीन डियाझ हर्नांडेज इन्स्टाग्राम)