अँथनी फॉसी : जगात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामधील सर्वांत जास्त या साथीने ग्रासलेला देश म्हणजे अमेरिका. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अँड इंफेक्शियस डिसिज' या संस्थेच्या संचालकांनी या देशाला मार्गदर्शन करण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावली.
मेगन दी स्टॅलियन: संगीतविश्वातील तिच्या योगदानासाठी टाइमने अग्रगण्य गटात रॅपरला स्थान दिले आहे. अभिनेता ताराजी पी हेंसन म्हणतात, ही फक्त रॅपिंग नाही करत तर वेगवेगळ्या, आव्हानांना पेलण्याची एक कला तिच्यामध्ये आहे.'
आयुष्मान खुराना: हिंदी सिनेमातील या अभिनेत्यानी विकी डोनर, शुभ मंगल ज्यादा सावधन, ड्रीम गर्ल यांसारख्या सिनेमांमधून आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत, म्हणून या यादीमध्ये त्याचं नाव घेण्यात आलं आहे.
बोंग जून हो: या ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाने दक्षिण कोरियाच्या सिनेमांना जगात स्थान मिळवून दिल्याबद्दल त्यांचं नाव या यादीत आहे. (Image: Time Magazine)
त्साई इंग-वेन: तैवानला आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या चीनच्या अथक प्रयत्नांना आव्हान देणाऱ्या तैवानच्या अध्यक्षा त्साई यांनाया यादीत घेणं गरजेचं होतं. (Image: Time Magazine)
मिशेला कोएल: नेटफ्लिक्स सीरिज च्युइंगगम आणि एचबीओ ओरिजनल 'आय मे डिस्ट्रॉय यू (2020)' या सीरिजमधून अभिनयाची चुणूक दाखवणारी आणि तिच्या नव्या कामातून लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणारी ही ब्रिटिश अभिनेत्री. तिलाही स्थान मिळालं आहे. (Image: Instagram)
कमला हॅरिसः अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीच्या उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणारी भारतीय-कृष्णवर्णीय समाजातली आणि ही निवडणूक लढवणारी पहिली भारतीय महिला. (Image: Instagram)
अँजेला मर्केल: 2005 सालापासून जर्मनीचं अध्यक्षपद सांभाळणारी यशस्वी महिला. (Image: AP)
'ब्लॅक लाइफ्स मॅटर'चे संस्थापक अलिसिया गार्झा, पॅट्रिस कुलर्स आणि ओपल टोमेती: 2020 मधील सामाजिक न्याय चळवळीतील या संस्थापकांनी कृष्णवर्णीय समुदायातर्फे नेतृत्व करून वर्णद्वेषी समाजात बदल घडवून आणण्याची मागणी केली. (Image: Time Magazine)
नाओमी ओसाका: यूएस ओपन विजयापेक्षाही या खेळाडूचं कौतुक तिने अनोख्या पद्धतीने 'ब्लॅक लाइफ्स मॅटर' चळवळीमध्ये भाग घेतल्याबद्दल करण्यात आलं आणि म्हणूनच या यादीत तिचा समावेश केला. (Image: Instagram)
बिलकिस बानो: भारतात दिल्लीतील शाहीनबागेत सक्रिय आंदोलन करणारी 82 वर्षीय महिला. जिनी भारत सरकारच्या नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात आंदोलन करून समाजावर स्वत: ठसा उमटवला. (Image: PTI)
वाद अल-कतेब: सीरियन पत्रकार, कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते यांनी आपल्या अनोख्या पद्धतीनी जगाला युद्धग्रस्त देशातील वास्तव दाखवून दिलं. 'समा' या चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. (Image: Instagram)
शिओरी इटो: देशातील #MeToo चळवळीचे चिन्ह. तसेच जपानमधील लैंगिक छळाविरूद्ध न्याय मिळवून देण्यासाठी यांनी मोलाचे योगदान दिलं आहे. (Image: Kyodo via Reuters)
सुंदर पिचाई : बाजारमूल्य 1 अब्ज अमेरिकी डॉलर असलेल्या गुगल या कंपनीचे सीईओ. तसेच त्यांनी त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनाने कंपनीला नवीन उंचीवर नेल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा समावेश. (Image: Instagram)
द वीकेंड: या गायकाची गाणी Spotify या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ऐकली गेली आहेत. त्यानी गायलेलं 'ब्लिंडिंग लाइट्स' हे सोलो गाणं 2020 मधलं सर्वांत लोकप्रिय पॉप गाणं ठरलं. (Image: Time Magazine)
नरेंद्र मोदी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या धोरणांसाठी आणि जबरदस्त फॅन फॉलोइंगसाठी या यादीत समावेश केला आहे. (Image: Instagram)
शी जिनपिंग: चीनचे अध्यक्ष जिनपिंग त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी धोरणांसाठी तसंच त्यांच्या देशात अजेय राहिले आहेत म्हणून त्यांना स्थान. (Image: AP)
फोबे वालर-ब्रिजः फ्लिबआगच्या या निर्मातीनी पटकथा लेखन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Image: AP)
ट्रेडोस अदनॉम घेब्रियेसुस : Covid -19 सारख्या जागतिक महामारीच्या काळात जगभरातील यंत्रणांचं यशस्वी नियमन करणं आणि या आपतकालीन परिस्थितीत विविध देशांना एकत्र काम करायला भाग पाडणारे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक ट्रेडोस यांच्या योगदानाचं कौतुक करण्यासाठी त्यांचं नाव या यादीत आहे. (Image: Reuters)
माइकल बी जॉर्डन: 'ब्लॅक पँथर' मध्ये चैडविक बोसमैनसोबत अभिनय करणाऱ्याला कृष्णवर्णीयांचं प्रतिनिधित्व करणं ही त्याची जबाबदारी वाटते आणि त्याने सर्व प्रथा मोडून काढल्या. (Image: Instagram)