सध्या अमेरिकेत कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नायगरा धबधबा पूर्णपणे गोठून गेला आहे.
नायगरा धबधब्याच हे दृश्य पाहून अगदी पांढरी शुभ्र बर्फाची चादर ओढल्याचा भास होत आहे.(लिंडसे डे डेरीओ )
या पांढऱ्या शुभ्र बर्फावर पडलेल्या रंगीबेरंगी इंद्रधनुष्यामुळे दृश्य खूपच सुंदर दिसत आहे.(लिंडसे डे डेरीओ )
याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. नायगरा धबधब्याची ही नयनरम्य दृश्य आपल्या कॅमेरात कैद करून घेण्याची लगबग दिसून येत आहे..(लिंडसे डे डेरीओ )
पर्यटकांना जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत आहे.(लिंडसे डे डेरीओ )
'गोट आयलंडने' या धबधब्याचे दोन भागात विभाजन केले आहे.(लिंडसे डे डेरीओ
पर्यटकांचा विचार करून याठिकाणी अनेक चांगली हॉटेल्स आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी करण्यात आल्या आहेत.(लिंडसे डे डेरीओ )
या धबधब्यावर कॅनडाच्या बाजूने प्रकाशझोत सोडण्यात आलेले आहेत. धबधबा पाहण्याची खरी मज्जा ही रात्रीच्या वेळी आहे.(लिंडसे डे डेरीओ )
बर्फाच्या चादरीने ओढलेला हा नायगरा धबधबा म्हणजे जगातील एक आश्चर्यच आहे.(लिंडसे डे डेरीओ )