NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / चिनीचा उद्दामपणा 2 महिलांनी उतरवला! कोण आहेत ह्या दोघी? ज्यांच्या भेटीनंतर तैवान म्हणाला झुकणार नाही

चिनीचा उद्दामपणा 2 महिलांनी उतरवला! कोण आहेत ह्या दोघी? ज्यांच्या भेटीनंतर तैवान म्हणाला झुकणार नाही

सध्या तैवान देशावरुन चीन आणि अमेरिका हे दोन बलाढ्य देश आमनेसामने आले आहेत. नुकतीच अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) कनिष्ठ सभागृहाच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग वेन यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांची भेट घेण्यापूर्वी नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या उपसभापती त्साई ची-चांग यांची भेट घेतली. बैठकीनंतर नॅन्सी पेलोसी आणि साय इंग वेन यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधला.

19

तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनीही बुधवारी पेलोसी यांना सांगितले की अमेरिका तैवानच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहे. वेनने पेलोसी यांना आंतरराष्ट्रीय मंचावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. (फोटो एएफपी)

29

राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन म्हणाल्या की, तैवान हा युनायटेड स्टेट्सचा विश्वासू भागीदार आहे. सुरक्षा, आर्थिक विकास आणि पुरवठा साखळ्यांमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी अमेरिकेसोबत काम चालू राहील. (फोटो एएफपी)

39

नॅन्सी पेलोसी म्हणाल्या की अमेरिकेला नेहमीच वाटते, की तैवान सुरक्षिततेसह स्वतंत्र्य असावा आणि यासाठी ते मागे हटणार नाही. (फोटो एएफपी)

49

तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पेलोसी म्हणाले की, तैवानशी आमची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. (फोटो एएफपी)

59

पेलोसी म्हणाल्या की अमेरिका आहे सध्याच्या स्थितीचे समर्थन करतो आणि बळजबरीने तैवानचे काहीही होऊ इच्छित नाही. (फोटो एएफपी)

69

त्यांच्या दौऱ्यामुळे तैवानमधील आर्थिक परिणामांबद्दल विचारले असता, पेलोसी म्हणाल्या की अमेरिका आणि तैवान यांच्यातील चांगल्या आर्थिक देवाणघेवाणीसाठी दरवाजे उघडतील. (फोटो एएफपी)

79

त्साई इंग-वेन म्हणाल्या की, पेलोसी यांच्या दौऱ्याची प्रतिक्रिया म्हणून चीनने सुरू केलेला लष्करी सराव ही अनावश्यक गोष्ट आहे. तैवान यथास्थिती राखण्यासाठी वचनबद्ध आहे. (फोटो एएफपी)

89

पेलोसी मंगळवारी उशिरा अचानक तैपेई येथे पोहोचल्या. त्या म्हणाले की ही भेट तैवानच्या लोकशाहीप्रती अमेरिकेची अतूट बांधिलकी दर्शवते. (फोटो एएफपी)

99

नॅन्सी पेलोसी यांनी ​​तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग वेन यांची भेट घेत चर्चा केली. राष्ट्रपतींची भेट घेण्यापूर्वी पेलोसी तैवानच्या उपसभापती त्साई ची-चांग यांची भेट घेतली. (फोटो एएफपी)

  • FIRST PUBLISHED :