जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एएफपीच्या आकड्यांनुसार जगभरात कोविड-19 (Covid-19) च्या रुग्णांचा आतापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे संसर्ग झालेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार गेली आहे.
वर्ल्ड ओ मीटरच्या आकड्यांनुसार संपूर्ण जगभरात 23,149,731 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे 8 लाख 03 हजार 807 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 57 लाख, 32 हजार 515 रुग्ण कोरोनापासून ठीक झाले आहेत.
कोरोना संसर्गाच्या प्रकरणात अमेरिका जगभरात पहिल्या, ब्राजील दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूची सर्वाधिक संख्या अनुक्रमे अमेरिका, ब्राजील, मेक्सिको या देशात आहे. भारतात या यादीच चौथा क्रमांक आहे.
अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.