स्वित्झर्लंड येथील दावोस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
स्वित्झर्लंड इथे दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. त्यांचे परिषदेतील काही फोटो समोर आले आहेत.
पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास महाराष्ट्र सरकारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या निमित्ताने एक वेगळा लूक संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे. त्यांचे फोटो उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहेत.