NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / भारतच नाही तर या देशांमध्येही निसर्गाचा तांडव! फोटो पाहून उडेल झोप

भारतच नाही तर या देशांमध्येही निसर्गाचा तांडव! फोटो पाहून उडेल झोप

जगातील अनेक देशांना हवामान बदलाचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. या घटनांमध्ये, भीषण पूर आणि प्रलयकारी वादळे मोठ्या प्रमाणावर विनाशकारी ठरली आहेत.

17

नैसर्गिक आपत्तीच्या घटनांनी अनेक देशांना वेठीस धरले आहे. हवामान बदलावरील UN च्या आंतरशासकीय पॅनेलने अशा तीव्र हवामानाच्या घटनांचा अंदाज काही महिने अगोदरच वर्तवला होता. या घटना वारंवार होतील असेही ते म्हटले होते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

27

या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. हजारो बेघर झालेले ऑस्ट्रेलियन लोक त्यांच्या घरी आणि व्यवसायाकडे परतत आहेत. त्यानंतर ते त्यांच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करतील. अजूनही आग्नेय भागातील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले जात आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

37

मध्य आफ्रिकेतील मोठा देश असलेल्या चाडमध्ये प्रदीर्घ दुष्काळानंतर, या वर्षी गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडल. राजधानी एन'जामेनासह मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. बोटींनीच लोकांची ये-जा होत आहे. हजारो लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत. अलिकडच्या वर्षांत, अतिवृष्टी, जमिनीचा ऱ्हास, चुकीचे शहरी नियोजन, पूर येणे ही नित्याची घटना बनली आहे. (प्रतिक छायाचित्र: विकिमीडिया कॉमन्स)

47

थायलंडमध्ये अलीकडेच आठ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. आधीच पुराचा सामना करत असलेल्या भागांसाठी या शनिवार व रविवार मुसळधार पाऊस एक मोठी धोक्याची घंटा आहे. देशातील 40 टक्के प्रांत आधीच पुरामुळे बुडाले आहेत. गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस आणि उष्णकटिबंधीय वादळांमुळे, देशातील 77 पैकी 59 प्रांत याच्या विळख्यात आले आहेत. तर साडेचार लाख घरे बाधित झाली आहेत. (प्रतिक छायाचित्र: विकिमीडिया कॉमन्स)

57

अलीकडेच, एका उष्णकटिबंधीय वादळाने उत्तर फिलीपिन्समध्ये भूस्खलनाटी घटना घडली आहे. सुमारे एक हजार लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. येथे ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत, जे पुढे दक्षिण चीन समुद्राकडे जात आहेत. फिलीपिन्समध्ये दरवर्षी टायफून मोठ्या प्रमाणावर विनाश करतात. (प्रतिक छायाचित्र: विकिमीडिया कॉमन्स)

67

कार्ल वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे मेक्सिकोच्या दक्षिणेकडील आखाताच्या किनार्‍याजवळील अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की पावसामुळे भूस्खलन, नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढण्याची आणि सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे. (प्रतिक छायाचित्र: विकिमीडिया कॉमन्स)

77

आपला शेजारी देश पाकिस्तानची अवस्थाही पूरपरिस्थितीमुळे वाईट झाली आहे. या वर्षी जूनमध्ये तेथे आलेल्या भीषण पुरात 1700 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात भीषण पूर आहे, ज्याचा प्रभाव अजूनही दिसत आहे. तिथले लोक अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मान्सूनच्या पावसात हिमनद्या अचानक वितळणे हे या पुराचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घटना हवामान बदलाशी संबंधित आहेत. (प्रतिक छायाचित्र: विकिमीडिया कॉमन्स)

  • FIRST PUBLISHED :