पाकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पाकमध्ये 3,505 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 51 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला.
या सगळ्यात पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ्टी किट सर्व डॉक्टरांना देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी युवा डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनी क्वेटामध्ये आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
एवढेच नाही तर पोलिसांनी 12हून अधिक डॉक्टरांना अटक केली आहे. या विरोधात आता बलुचिस्तानमधील काही डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले आहे.
या लाठीचार्जच्या निषेधार्थ 'यंग डॉक्टर्स असोसिएशन'ने रुग्णालयातील सेवेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.