NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ट्रॅव्हल / चांगली नोकरी सोडून मुलगी करतीये भटकंती; व्हॅनलाच बनवलंय घर, जाणून घ्या कहाणी

चांगली नोकरी सोडून मुलगी करतीये भटकंती; व्हॅनलाच बनवलंय घर, जाणून घ्या कहाणी

Woman Adopted Van life Ditching Job: एमी निकोल्सन (Amy Nicholson) नावाच्या 35 वर्षीय महिलेने तिचे आयुष्य 360 अंशात बदलले आहे. यूकेच्या केंटमध्ये ती 9 ते 5 नोकरी करत होती आणि सामान्य जीवन जगत होती. परंतु आता तिने तिचे संपूर्ण घर एका व्हॅनमध्ये बसवले आहे. या व्हॅनद्वारे ती जगाच्या विविध भागात फिरत आहे. एमीच्या बदललेल्या आयुष्याची मनोरंजक छायाचित्रे पाहुया.

17

35 वर्षीय एमीने कोरोना महामारीच्या काळात तिची कंटाळवाणी 9-5 नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला. तिने एक व्हॅन विकत घेतली. या व्हॅनची किंमत 9 लाख 60 हजार रुपये होती. लॉकडाऊनच्या काळातच एमीने या व्हॅनला राहण्यायोग्य घरात बदलले.

27

केंटमध्ये राहणारी एमी आता कॉर्नवॉलमध्ये राहते. ऑफिसची नोकरी सोडल्यानंतर ती आता घरून काम करते आणि मार्केटिंग सल्लागार म्हणून चांगले पैसे कमवते. द सनच्या रिपोर्टनुसार, एमीने कोरोनाच्या काळात घरी गेल्यानंतर असेच आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता.

37

याआधी ती लंडनमध्ये 9-5 मार्केटिंग असिस्टंट म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने व्हॅन विकत घेतली आणि त्यात राहण्याची व्यवस्था केली. तिच्या व्हॅनमधील सर्व काही इलेक्ट्रिक आहे आणि तिने तिचा सोफा डबल बेडमध्ये बदलला आहे आणि तो व्हॅनमध्ये बसवला आहे.

47

नीड टू नो शी बोलताना, एमीने खुलासा केला की तिला साधे जीवन जगायचे होते, म्हणून तिने एक मोठी व्हॅन घेतली, ती घरासारखी बदलली. 2020 च्या संपूर्ण हिवाळ्यात तिने ते काम केलं. तेव्हा कोरोनामुळे बहुतेक गोष्टी बंद होत्या.

57

तिने व्हॅनच्या घरात 3 खिडक्या बसवल्या आहेत, जेणेकरून योग्य व्हेटिलेशन आणि दिवसा आणि रात्रीचा प्रकाश येऊ शकेल. एमीने व्हॅनमध्ये सोलर पॉवर प्लांट लावला आहे, ज्यामुळे संपूर्ण व्हॅनमध्ये इलेक्ट्रिक सिस्टम काम करते.

67

व्हॅनमध्ये भिंती आणि छत बसवल्यानंतर ते एमीने रंगवले आहे. काही स्टोरेज स्पेस आणि शेल्फ्'चे रुप देखील बनवले आहेत, जे सर्फिंग वॉलपेपरने झाकलेले आहेत. व्हॅनमध्ये सोफे, टेबल आणि काही फर्निचर आहे.

77

इतकंच नाही तर एमीने किचन टॉप आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टीही ठेवल्या आहेत, जिथे ती स्वतःसाठी स्वयंपाक करते. ६ महिन्यांत व्हॅनच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केल्याचे ती सांगते. आठवड्यातून काही दिवस ती त्यावर काम करायची. आता तिचे मित्र आणि कुटुंबीय व्हॅनमध्ये येतात आणि सुट्टी साजरी करतात. (श्रेय- सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@freelance_amy)

  • FIRST PUBLISHED :