NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ट्रॅव्हल / Travel Tips: स्वस्तात विमानाचं तिकीट कसं बुक करावं? फॉलो करा या 6 टिप्स

Travel Tips: स्वस्तात विमानाचं तिकीट कसं बुक करावं? फॉलो करा या 6 टिप्स

विमानाने प्रवास करणं आता महागलं आहे. त्यामुळे विमानानं जावं की नाही हा अनेकांना प्रश्न पडतो. जर कमी पैशात विमानाचं तिकिट बुक करायचं असेल तर या ट्रॅव्हल एजंटने दिलेल्या 6 टिप्स फॉलो करा.

17

विमानाने प्रवास करणं आता महागलं आहे. त्यामुळे विमानानं जावं की नाही हा अनेकांना प्रश्न पडतो.

27

जर कमी पैशात विमानाचं तिकिट बुक करायचं असेल तर या ट्रॅव्हल एजंटने दिलेल्या 6 टिप्स फॉलो करा.

37

ट्रॅव्हल एजंट निक्कीने सांगितले की, सर्वप्रथम गुगल फ्लाइटवर स्वस्त फ्लाइटचा पर्याय निवडा. प्रवासाची तारीख टाका. ते तुम्हाला सर्वात स्वस्त फ्लाइट शोधून देईल. गुगल फ्लाइट्स प्रवाशांना ठिकाण शोधण्यासाठी आणि स्वस्त फ्लाइट पर्याय शोधून देतात.

47

आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे किंमत सेट करणे. सर्वात स्वस्त डील मिळवण्यासाठी फक्त Google Flights वर ऑफर आणि डिल्स एक्सेस करा, यानंतर अलर्टवर क्लिक करा. तुम्हाला येथून सर्वोत्तम डील मिळण्यास मदत होते. बर्‍याच ट्रॅव्हल बुकिंग किंवा एअरलाइन्सच्या वेबसाइटवर भाड्याच्या माहितीसाठी फेअर अलर्ट पर्याय उपलब्ध आहे, यावरही लक्ष ठेवा.

57

जास्त अंतर असेल तर स्टॉपओव्हरचा पर्याय तुमची खूप बचत करेल. स्टॉपओव्हर म्हणजे फ्लाइट मध्यभागी कुठेतरी थांबेल. तुम्ही याला कनेक्टिंग फ्लाइट देखील म्हणू शकता.

67

जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर काही विमानतळाची ओळख करुन घ्या. उदाहरणार्थ, जर तुम्हाला न्यूयॉर्कला जायचे असेल तर तुम्ही मुंबई तसेच दिल्लीहूनही जाऊ शकता. पण दोन्ही ठिकाणच्या तिकिटात बराच फरक असेल. त्यामुळे जिथे स्वस्त मिळेल तिथून प्रवास करा. यासाठी तुम्ही Youtube ट्रॅव्हल एजंटचे व्हिडिओ फॉलो करू शकता.

77

तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर सर्व तिकिटे एकत्र बुक करायला विसरू नका. त्यासाठी कमी पैसे खर्च होतात. एकाच फ्लाइटमधून एकाच व्यवहारात प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र तिकीट बुक करण्यापेक्षा तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतील.

  • FIRST PUBLISHED :