महाराष्ट्राला मोठं निसर्गाचं वैभव लाभलं आहे. त्यात पावसाळा सुरू झाला की आपसुकच लोक डोंगर, दऱ्या, धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक पर्यटन स्थळे म्हणून अकोले तालुक्याची ओळख आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असातत.
सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. तालुक्यातील अनेक धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत आणि नदी नाले ओसंडून वाहत आहेत.
अकोले शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात कुमशेत हे गाव आहे.
मुसळधार पाऊस पडत असल्याने गावातील आकर्षक दृश्ये पर्यटकांना आकर्षित करत आहेत. छोट मोठे ओढे, धबधबे प्रवाहित झाले आहेत.
डोंगरांवर धुक्याची चादर पसरली आहे. हा नजारा जणू काही डोंगर दऱ्यांनी हिरवी चादर पांघरल्यासारखा दिसतोय.
पावसाळा सुरू होताच कुमशेत परिसरात मोठ्या संख्येने लोक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. इथला निसर्ग सर्वांना भुरळ घालतो.
या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी येजा असते. त्यामुळे पर्यटकांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम अशी व्यवस्था राजुर, शेंडी, भंडारदरा व अकोले या गावांमधील हॉटेलमध्ये उपलब्ध आहे.
या परिसरातील नयनरम्य दृश्ये पाहिल्यानंतर इथं येण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार ऋतिक चासकर यांनी येथील निसर्ग सौंदर्य टिपलं आहे.