NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Whatsappवर Online असाल तरीही कुणाला कळणार नाही, वापरा ही सिक्रेट ट्रिक

Whatsappवर Online असाल तरीही कुणाला कळणार नाही, वापरा ही सिक्रेट ट्रिक

WhatsAppनं एक फीचर सादर केलं आहे. या फीचरमुळं यूजर्स त्यांचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकतात. हे अ‍ॅपचे एक प्रमुख अपडेट आहे, जेणेकरुन वापरकर्ते ऑनलाइन असतानाही इतर लोक ते पाहू शकणार नाहीत. यासाठी वापरकर्त्यांना सेटिंगमध्ये बदल करावा लागेल.

15

व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्ससाठी नवीन प्रायव्हसी फीचर आणलं आहे. या इन्स्टंट मेसेजिंग अॅपनं एक फीचर सादर केलं आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांचे ऑनलाइन स्टेटस लपवता येऊ शकतं. जेणेकरुन वापरकर्ते ऑनलाइन असतानाही इतर लोक ते पाहू शकणार नाहीत. यासाठी वापरकर्त्यांना सेटिंगमध्ये बदल करावा लागेल. अॅपमध्ये हे प्रायव्हसी फीचर आधीपासूनच आहे. त्यामुळे तुमचीही इच्छा असेल की तुम्ही कधी ऑनलाइन आहात हे कोणाला कळू नये, तर तुम्ही ते सहज करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला सेटिंग बदलावं लागेल हे लक्षात ठेवा.

25

हे लास्ट सीन फीचरप्रमाणेच काम करेल. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं ऑनलाइन स्टेटस लपवलं तर तुम्ही इतर कोणीही ऑनलाइन असल्याचंही पाहू शकणार नाही.

35

हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुम्हाला तुमचं अॅप अपडेट करावं लागेल. परंतु या नवीन प्रायव्हसी अपडेटमुळं आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे हे जाणून घेणं वापरकर्त्यासाठी कठीण होईल.

45

हे फीचर सुरु करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जा आणि थ्री डॉट आयकॉनवर टॅप करा. आता सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटवर टॅप करा आणि प्रायव्हसी पर्यायावर जा.

55

येथे तुम्हाला 'लास्ट सीन आणि ऑनलाइन' फीचर मिळेल. यातून तुम्ही नोबडी सिलेक्ट करू शकता जेव्हा तुम्ही ‘nobody' निवडता, तेव्हा तुमची ऑनलाइन स्थिती कोणालाही दिसणार नाही आणि ती लपवली जाईल. येथे तुम्ही ‘my contacts’ पर्याय निवडू शकता. असं केल्यानं तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असलेल्या लोकांना तुम्ही ऑनलाईन आहात की नाही, हे दिसू शकतं.

  • FIRST PUBLISHED :