दरवर्षी ७ जुलै रोजी ‘जागतिक चॉकलेट दिन’ साजरा केला जातो.
जगभरातील सुमारे 1 अब्ज लोक दररोज चॉकलेट खातात.
उत्कृष्ट चवीशिवाय चॉकलेटचे काही फायदे देखील आहेत.
चॉकलेट कोणाला आवडत नाही? अगदी लहान मुलापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते.
अलीकडच्या काळात तर वाढदिवस, सणवार अशा आनंदाच्या क्षणी चॉकलेट देऊन आणंद साजरा केला जाते.
लहान मुलाला समजावण्यापासून ते अगदी प्रेयसीला मनवण्यापर्यंत सारं काम चॉकलेट करते.
चॉकलेटचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्याला हव्या त्या पद्धतीचे चॉकलेट खाऊ शकतो.