NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / End-to-end encrypted असूनही WhatsApp Chat का लीक होतात? ही आहेत कारणं

End-to-end encrypted असूनही WhatsApp Chat का लीक होतात? ही आहेत कारणं

WhatsApp जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात दररोज लाखो मेसेज यावर येत असतात. अशात व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षाही तितकीच मजबूत आहे. युजर्सचे मेसेज कंपनीदेखील वाचू किंवा ऐकू शकत नसल्याचं WhatsApp कडून सांगण्यात आलं आहे. WhatsApp मेसेजेस इनक्रिप्टेड (Encrypted) असतात. हे मेसेज एंड-टू-एंड (end-to-end) युजरलाच पाहता येतात. तरी चॅट लीक झाल्याचं समोर आलं आहे. यामागे काही कारणं आहेत.

17

WhatsApp Chats चा Backup Google Drive वर जातो. युजर स्वत: आपल्या Email ID ने याला लिंक करू शकतात. WhatsApp च्या चॅट बॅकअप सेटिंग्समध्ये हे पाहता येतं.

27

अधिकतर युजर्स चॅट Auto बॅकअप ठेवतात. यामुळे जुने चॅट्स शोधण्यास आणि फोन बदलल्यानंतर ते रिस्टोर करण्यास मदत होते. मेसेज, चॅट लीक होण्यामागे हेच कारण आहे.

37

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स End-to-end encrypted आहेत. पण गुगल ड्राईव्हवर जे चॅट बॅकअप होतात, ते End-to-end encrypted नाहीत. चॅटमध्ये जे काही फोटो, व्हिडीओ असतील, ते सर्व गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतात.

47

जर युजरचं Gmail Account अ‍ॅक्सेस केलं, तर अनेक चॅट हिस्ट्री आणि बॅकअपसह फोटोही मिळतील. अनेक प्रकरणात हीच बाब समोर आली आहे, की चॅट बॅकअपमुळे प्रायव्हेट फोटो किंवा चॅट लीक झाले आहेत.

57

सध्या WhatsApp Backup साठी End-to-end encrypted ची सुविधा नाही.

67

परंतु काही दिवसांपूर्वी WhatsApp ने Backup साठीही End-to-end encrypted फीचर अपडेट करणार असल्याचं सांगितलं होतं.

77

WhatsApp ने ते कोणत्याही युजर्सचे चॅट वाचत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच युजर्सचं चॅट End-to-end encrypted मुळे सेफ, सुरक्षित राहत असल्याचाही दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे.

  • FIRST PUBLISHED :