अगदी पर्सनल मेसेज ते ऑफिसच्या कामापर्यंत Whatsapp वर ढिगाने मेसेज येत असतात. सध्या संवाद साधण्याचं सर्वात मोठं आणि सोपं साधन तेच आहे. त्यामुळे Whatsapp ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा ओळखून नवीन फीचर्स आणत आहे.
काही महिन्यांपूर्वी जुने मेसेज गायब होणार असं फीचर आणलं, मात्र त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या, हे समजून घेऊन त्यांनी Disappearing Messages फीचरबाबत हे फीचर आहे.
आता यूजर्सना गायब होणारे मेसेज सेव्ह करण्याचीही सुविधा मिळणार आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी हे फीचर लाँच केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कीप इन चॅट हे फीचर आहे. या अंतर्गत तुम्हाला गायब होणारे मेसेज सेव्ह करता येणार आहेत.
यासोबत Superpower to sender हे फीचर आणलं आहे. ज्यामुळे Whatsapp अधिक सुरक्षित राहील आणि गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
तुम्हाला जर Whatsapp message सेव्ह करायचे असतील तर समोरच्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. जर ही परवानगी मिळाली नाही तर सेव्ह करता येणार नाहीत. जर मिळाली तर तुम्ही अगदी सहज सेव्ह करू शकता.
मेसेज सेव्ह करताना समोरच्यालाही त्याचे नोटिफिकेशन जाणार आहे. त्याने अप्रुव्ह केल्यावरच पुढची प्रक्रिया करू शकता. तसंच तुम्हाला या फीचरसाठी टाइम लिमिट दिलं जाणार आहे. जसं Disappearing Messages साठी देण्यात आलं होतं.