व्हॉट्सअॅपनं (WhatsApp) अलीकडेच iOS बीटा iOS 22.18.0.70 साठी अपडेट सादर केलं होतं. त्यामुळं चॅट लिस्टमधूनच स्टेटस अपडेट पाहता येऊ शकते. आता WhatsApp iOS बीटा साठी Undo फीचरवर काम करत आहे. या फिचरमुळं चुकून डिलीट झालेले मॅसेज रिकव्हर करता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे फीचर अँड्रॉइड बीटा साठी जाहीर करण्यात आलं होतं. हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा अँड्रॉइड 2.22.13.5 अपडेटमध्ये आलं आहे, जेणेकरून चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करता येतील.
WABetaInfo ने जारी केलेल्या अहवालानुसार, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे डिलीट झालेला मॅसेज रिकव्हर करण्यासाठी युजर्सना फक्त काही सेकंद मिळतील. तसेच, हे फीचर फक्त वन-इन-वन चॅटमध्ये 'Delete for Me'साठी कार्य करेल. ‘delete for everyone’साठी हे फीचर काम करणार नाही.
WhatsApp अशा फीचरवर काम करत आहे ज्यामुळे यूजर्स लोकांचे स्टेटस सहज पाहू शकतील. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळे यूजर्स चॅट लिस्टमध्येच स्टेटस पाहू शकतील अशी माहिती देण्यात आली आहे. WABetaInfo ने सांगितले आहे की, हे फीचर सध्या अँड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी सादर करण्यात आलं आहे.
WB नं सांगितलं की, पूर्वी जसे आम्ही एखाद्याचे स्टेटस पाहण्यासाठी स्टेटस विभागात जायचो, आता यूजर्सना त्यांच्या चॅटमध्येच त्या कॉन्टॅक्टचं स्टेटस दिसेल. WB ने आपल्या पोस्टसह एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, जो दर्शवितो की हे फीचर इंस्टाग्रामच्या स्टोरीसारखं दिसते.