आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे हरि पाहिला रे - संत ज्ञानेश्वर
शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं । पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें, कैसागे माये हा तारकु दिवटा । पंढरी वैकुंठा प्रगटला - संत मुक्ताबाई
तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी - संत एकनाथ
अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां - संत नामदेव
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं- संत तुकाराम
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना।- संत रामदास
अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां- संत चोखामेळा
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||- संत सावता माळी
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥ भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥- संत जनाबाई