हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे नागपंचमी.
नागपंचमीच्या दिवशी सापांची, खासकरून नागांची पूजा करण्याची प्रथा आहे.
नागपंचमी सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानं संकट दूर होतात.
काही धार्मिक ग्रंथांमध्ये नागांचं वर्णन शिवप्रभूंचा अलंकार आणि विष्णूची शय्या म्हणून आढळतो. त्यामुळे हिंदू धर्मात नागाला पूजनीय स्थान आहे.
अनेक ठिकाणी शिवलिंगावर देखील नागाच्या मूर्ती स्थापित आहेत आणि त्यांची पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळात दूध आणि लाह्या अर्पण करून नागदेवाची पूजा करतात.
नागदेवाची पूजा केल्यानं सापांविषयीची भिती दूर होते असं मानले जातं.
तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्यांनीही या दिवशी काही विशेष उपाय केल्यास त्यांच्या कुडलीतील दोष दूर होतो, अशीही मान्यता आहे.