WhatsApp आपल्या डेस्कटॉप बीटा वापरकर्त्यांसाठी एक नवीन इमेज ब्लरिंग टूल आणत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, या नवीन टूलद्वारे यूजर्स चॅटमधील संवेदनशील फोटो किंवा माहिती पाठवण्यापूर्वी ब्लर करू शकतील. याचं नाव ब्लर टूल आहे, आणि ते WhatsApp डेस्कटॉप बीटा 2.2241.2 साठी आहे.
रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या फक्त काही बीटा टेस्टर्सना दिले जात आहे, त्यामुळे जर तुम्हाला हे फीचर दिसत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. डेस्कटॉप बीटासाठी ब्लर फीचरवर काम सुरू आहे. हे व्हर्जन परीक्षकांसाठी उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले.
WB ने या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये हे ब्लर टूल फीचर कसे काम करेल हे स्पष्टपणे दिसते. या टूल अंतर्गत युजर्स यापैकी किती एरिया ब्लर करायचा हे निवडता येते. याच्या मदतीने तुम्ही फक्त ब्लग भाग निवडू शकता.
तुम्हालाही हे फीचर मिळाले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही फोटो पाठवण्याचा प्रयत्न करू शकता आणि फोटो पाठवताना तुम्हाला ब्लर बटण दिसले तर तुम्ही नवीन ड्रॉईंग टूलचा सहज वापर करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला हे वैशिष्ट्य मिळाले नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप अॅप्ससाठी नवीन एडिटिंग टूल सादर केले होते. हे फीचर मोबाइल अॅप्समध्ये आधीपासूनच होते. एडिटिंग टूलने युजर्स त्यांचे फोटो एडीट करू शकतात.