व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या अॅपवर एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या माध्यमातून डॉक्युमेंट शेअर करताना कॅप्शनचा पर्याय दिला जाईल. WABetaInfo नं शेअर केलेल्या माहितीवरून, असं लक्षात येत आहे की, व्हॉट्सअॅपनं टेस्टफ्लाइट बीटा प्रोग्रामसाठी अपडेट सबमिट केलं आहे. हे अपडेट आवृत्ती 22.20.0.75 साठी आहे. असं सांगण्यात आलं आहे की व्हॉट्सअॅप 'डॉक्युमेंट कॅप्शन' फीचरवर काम करत आहे.
या फीचरच्या माध्यमातून आता कागदपत्रे शेअर करणं सोपं होणार आहे. WB नं सांगितलं की, या फीचरमुळं जेव्हा जेव्हा वापरकर्ते एखादं डॉक्युमेंट शेअर करतील तेव्हा त्यांना त्यासोबत कॅप्शन लिहिण्याचा पर्याय देखील मिळेल.
WB ने या नवीन फीचरबद्दल एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तसं पाहिल्यास हे स्पष्ट आहे की त्यात एक कॅप्शन बार आहे जेथे वापरकर्ते डॉक्युमेंटसाठी कॅप्शन लिहू शकतात. तर Android साठी WhatsApp बीटा वरील समान फीचरच्या तुलनेत, एक डॉक्युमेंट शेअर करण्यापूर्वी त्याचा प्रीव्ह्यू दिला जाऊ शकतो. (फोटो: WABetaInfo)
WB ने ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की iOS साठी WhatsApp च्या सध्याच्या आवृत्तीवर प्रीव्ह्यू आधीपासून आहे. परंतु ते हायलाइट करण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही Android साठी WhatsApp बीटा वर शेअर करत असलेल्या डॉक्युमेंटचा प्रीव्ह्यू करणं शक्य नाही. हा या दोघांमधील मुख्य फरक आहे.
या आगामी फीचरच्या माध्यमातून चॅटमध्ये डॉक्युमेंट शोधणं सोपं होणार आहे. त्वरित शोध घेण्यासाठी, वापरकर्त्यांना फक्त कॅप्शन टाइप करावं लागेल आणि त्यांना डॉक्युमेंट सहज सापडेल. हे फीचर लवकरच लाँच होऊ शकतं, मात्र सध्यातरी त्याच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही माहिती नाही.