तुमचं फेसबुकचं फेक अकाउंट असल्याचं आढळल्यास (Facebook Fake Account) तुमच्या स्वत:च्या अकाउंटवर ते फेक प्रोफाईल शोधा किंवा तुमच्या मित्रांना त्या फेक अकाउंटची लिंक पाठवण्यास सांगा.
त्यानंतर फेक अकाउंटच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
Find support or report profile यावर क्लिक करा.
आता Pretending to be someone या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तीन पर्याय दिसतील. Me, a friend, celebrity असे पर्याय दिसतील. तुमचं प्रोफाईल फेक असल्यास Me वर क्लिक करा.
काही वेळातच तुमचं फेक अकाउंट बंद होईल.
त्यानंतर तुमच्या खऱ्या प्रोफाईलवर फेक अकाउंटबाबत माहिती द्या.