NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / दिवाळीला कार घ्यायचा विचार करताय? या वाहनांवर मिळतोय तगडा डिस्काउंट

दिवाळीला कार घ्यायचा विचार करताय? या वाहनांवर मिळतोय तगडा डिस्काउंट

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर कार उत्पादक कंपन्या आणि डीलर्सनीही वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर्स आणल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या काळात तुम्ही रोख सवलत तसेच कॉर्पोरेट ऑफ आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर अनेक आकर्षक अॅक्सेसरीजही डीलर्सकडून देण्यात येत आहेत

15

मारुती सुझुकी आपल्या फ्लॅगशिप मॉडेल Alto 10 वर 39 हजारांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये तुम्ही 20 हजार रुपयांची रोख सवलत, 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 15 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकता. Alto K10 ची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.83 लाख रुपयांपर्यंत जाते.

25

कंपनी Celerio वर मोठ्या सवलती देखील देत आहे. या कारवर 54 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. या कारच्या खरेदीवर तुम्ही 35,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट घेऊ शकता. याशिवाय 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर केली जात आहे. तथापि या कारच्या CNG प्रकारांवर कोणतीही सूट मिळणार नाही. कारच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या कारची किंमत 5.25 लाख रुपयांपासून ते 7 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

35

मारुती सुझुकी दिवाळीला आपल्या छोट्या सेगमेंटच्या बजेट कारवर 54 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 35 हजारांचा कॅशबॅक, 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. एसप्रेसोची किंमत 4.25 लाख ते 5.99 लाख रुपये आहे.

45

टाटाने प्रथम Tiago ची EV आवृत्ती आणून बाजारपेठेत आघाडी घेतली आहे आणि आता कंपनी तिच्या पेट्रोल प्रकारांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. कंपनीने Tiago च्या मॅन्युअल वेरिएंटवर 20 हजारांची सूट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट केला आहे. त्याच वेळी कंपनी आपल्या सीएनजी प्रकारांवर देखील हीच ऑफर देत आहे.

55

Altroz वर टाटा कडून 20 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. कंपनी 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. तथापि स्वयंचलित आवृत्तीवर कोणतीही सूट दिली जात नाही.

  • FIRST PUBLISHED :