NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Tech tips : चुकूनही 100 टक्के चार्ज करू नका तुमचा फोन, पाहा काय होऊ शकतं नुकसान

Tech tips : चुकूनही 100 टक्के चार्ज करू नका तुमचा फोन, पाहा काय होऊ शकतं नुकसान

Tech tips in marathi : तुम्ही 100 टक्के फुल चार्ज करता का तुमचा फोन? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

18

बऱ्याचदा आपण किंवा घरातले मेंबर्स हे फोनला 100 टक्के फुल चार्ज करण्यावर भर देतात. त्यांचा असा समज असतो किंवा बॅटरी फुल चार्ज केली की आपल्याला ती जास्त काळ टिकेल. पण सतत १०० टक्के बॅटरी चार्ज करणं किंवा अति चार्ज करण्याचे तोटे देखील खूप जास्त आहेत आज आपण नेमकं काय होऊ शकतं आणि खरंतर किती टक्के फोन चार्ज करणं योग्य आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

28

बॅटरीशिवाय फोनचं अस्तित्वच नाही. जर बॅटरी खराब झाली किंवा नसेलच तर फोन चालणार नाही हे तर माहितीच आहे. मग ती बॅटरी आपल्या काही छोट्या चुकांमुळे लवकर खराब होऊ शकते. ती टाळण्यासाठी काय काय करायचं आज आपण जाणून घेणार आहोत.

38

बॅटरीची काळजी घेणं खूप जास्त आवश्यक असते. यासाठी नेहमी सांगितलं जातं की टीव्ही वॉशिंगमशीनजवळ फोन ठेवू नका. गॅसजवळ फोन ठेवू नका. फोनमध्ये पाणी शिरु देऊ नका त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

48

बरेचदा 100 टक्के बॅटरी चार्ज होईपर्यंत फोन चार्ज केला जातो. तर बॅटरी १० टक्क्यांवर उतरल्यावर चार्जिंगला लावला जातो. या दोन्ही सवयी तुमच्या बॅटरीच्या आयुष्यासाठी वाईट आणि घातकच आहेत. त्यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होऊ शकतं.

58

आधीच्या अॅसिड बॅटरीप्रमाणे पुढील चार्जिंगपूर्वी फोनची बॅटरी पूर्णपणे डाउन होण्याची वाट पाहू नये असं तज्ज्ञांचे मत आहे. सध्याच्या काळातील बॅटरी या लिथियम आयन बॅटरी आहेत, असं केल्यास नुकसान होऊ शकते. बॅटरी फुल चार्ज झाली किंवा 10 टक्क्यांवर असेल तर तिला अधिक दबाव आणि अधिक काम करावं लागतं. यामुळे दोन्ही गोष्टी टाळल्या तर बॅटरीचं आयुष्य नक्की वाढवता येईल आणि लवकर खराब होणार नाही.

68

बॅटरी चार्ज करण्यााची योग्य पद्धतही त्यांनी सांगितली आहे. फोनचे चार्जिंग 80 ते 90 टक्के चार्जिंगने बंद केले पाहिजे. बॅटरी 20 किंवा 30 टक्क्यांपर्यंत उतरली तर लगेच पुन्हा चार्जिंगला लावलं पाहिजे यामुळे बॅटरी खूप चांगली दीर्घकाळासाठी टिकेल.

78

स्मार्टफोनचा विचार केला तर तो कितीही वापरला तरी तो कालबाह्य किंवा एक्सपायर होत नाही. वास्तविक स्मार्टफोनची एक्सपायरी डेट नसते. पण अशी काही कारणे आहेत ज्यांमुळे स्मार्टफोन खराब होतो.

88

स्मार्टफोन काजच्या काळात कोणाकडे नाही? अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक फोन वापरतात. फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सगळ्याच कामासाठी आपण त्याच्यावर अवलंबून असतो. मग ते पैसे पाठवायचे असोत, किंवा सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायचा असो.

  • FIRST PUBLISHED :