कारच्या सीटवर बसताना नेहमी शक्य तितकं सरळ बसा. सीट बेल्ट लावताना नेहमी लक्षात ठेवा की सीट बेल्ट गळ्यावरून जाण्याऐवजी छातीवर लावा.
ज्या चालकांची उंची कमी आहे, त्यांनी सीटवर बसण्याआधी स्वत: नुसार ती योग्यरित्या अडजस्ट करावी. यामुळे सीट बेल्ट शरीराच्या वरच्या अर्ध्या भागावर आरामात ठेवता येतो.
बहुतेक आधुनिक कार बी पिलर सीट बेल्ट अॅडजस्टेबल पॉइंटसह येतात. तुम्ही तुमच्या सीट बेल्टसाठी योग्य पोझिशनमध्ये येत नाही, तोपर्यंत तो अडजस्ट करा.
सीट बेल्ट रॅप कुशन खरेदी करा. ते कितपत आरामदायी असेल याची शाश्वती नाही. पण, अनेकांना असं वाटतं की त्यात वापरण्यात आलेले सॉफ्ट टच मटेरियल श्वास गुदमरण्यापासून वाचवतं.