देशात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अशात सगळ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. यात व्हॉट्सअॅप हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं अॅप आहे. पण याच अॅपसंदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचा फोन नंबर हा गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचं संशोधन समोर आलं आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला सर्च करून मेसेज करू शकतं असं या संशोधनात म्हटलं आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सएपच्या क्लिक टू चॅट फीचरमुळे हा गोंधळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हॉट्सअॅपच्या या वैशिष्ट्यासह वापरकर्ते यूआरएल लिंक किंवा क्यूआर कोड तयार करू शकतात. त्यामुळे, कोणालाही नंबर न विचारता किंवा नंबर सेव्ह न करता लिंक किंवा कोड वापरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
खरंतर हे वैशिष्ट्ये काही गोष्टी अतिशय उपयोगाचंही आहे. खासकरुन त्यांच्यासाठी जे व्हॉट्सअॅप व्यवसायासाठी वापरतात. पण यामुळे आपला नंबर सार्वजनिक होता आणि कोणीही Google वर शोधू शकतं हे लक्षात असू द्या.
यावरून सध्या सोशल मीडियावर मोठा वाद सुरू आहे. व्हॉट्सअॅपने हे मुद्दामहुन केलं असल्याची चर्चा आहे. परंतु गुगलनं अल्गोरिदम केलं आणि Click to chat च्या मेटाडेटावरून सर्व फोननंबर काढून टाकले. हे नंबर नंतर गुगल सर्च इंडेक्समध्ये सेव्ह केरण्यात आले आहेत.
दरम्यान, हे माहिती लीक होण्याचं प्रकरण असल्याची माहिती थ्रेटपोस्टने दिली आहे. तर ही काही मोठी गोष्ट नाही असं फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे. Google सर्च रिझल्टमध्ये तिच माहिती आहे ज्याला वापरकर्त्यांनी पब्लिक करण्यासाठी निवडली आहे.
पण click to chat केल्यानं आपली माहिती गुगलमध्ये दिसते याबद्दल वापरकर्त्यांना कोणतीही माहिती नाही.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातून आपण कसे सुरक्षित राहाल.
तर आपला नंबरही Google वर न येण्यासाठी click to chat हे फीचर वापरू नका. जर आपण आधीपासूनच हे वापरलं असेल तर हे तुम्हाला बंद करावं लागेल.