ऑस्ट्रेलियातील नव्या सोशल मीडिया घोटाळ्याला अनेक लोक बळी पडत आहेत. यात अनेकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला आहे. अशा काही घटना भारतात देखील घडल्या आहेत. हा स्कॅम अशा आहे की भलेभले लोक जाळ्यात अडकतात. पाठवलेल्या लिंकवर क्लिक करतात आणि डेटा गुन्हेगारांच्या हाती लागतो. (प्रतिमा- शटरस्टॉक)
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अशा स्कॅममध्ये तुम्हाला तुमच्या मित्राच्या अकाऊंटवरून मेसेंजरवर मेसेज येतो. एखाद्या मित्रासोबत तुम्ही अनेक दिवस बोलला नसेल किंवा मित्राच्या नावाने बनावट खातं तयार करुन तुम्हाला मॅसेज केलेला असू शकतो. (प्रतिमा- शटरस्टॉक)
पाठवलेल्या मेसेजमध्ये 'बघा कोण मेले' असे लिहिलेले असते. त्यात एका बातमीच्या लेखाची लिंक देखील असते. यामध्ये अशा व्यक्तीचाही उल्लेख केलेले असतो, जिला तुम्ही ओळखता किंवा स्वतः व्यक्तीही असतो. जेणेकरून तुमचा विश्वास बसेल. (इमेज- शटरस्टॉक)
जर तुम्ही लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक केले तर तुम्हाला तुमचे Facebook खाते वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाकण्यास सांगितले जाते. पण, हा सापळा आहे. कारण ही लिंक हानीकारक सॉफ्टवेअर आहे जे तुमचे लॉगिन तपशील आणि वैयक्तिक तपशील चोरते. (प्रतिमा- शटरस्टॉक)
गुन्हेगारांना तुमच्या खात्यात एक्सेस मिळताच ते तुमच्याकडून अकाउंटचा एक्सेस घेतात. मग हाच मेसेज तुमच्या अकाउंटवरून तुमच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांना पाठवला जातो. अशा प्रकारे डेटा चोरीचा खेळ सुरूच आहे. (इमेज- शटरस्टॉक)
हॅकर्स तुमच्या फेसबुक खात्याशी संबंधित तपशील जसे की ई-मेल पत्ता, फोन नंबर आणि जन्मतारीख देखील चोरतात. स्कॅमर इतर ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही माहिती वापरतात. जर त्यांना तुमच्या तपशिलांमधून तुमच्या बँक खात्यात प्रवेश मिळाला तर ते तेही रिकामे होऊ शकते. अशा परिस्थितीत, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा. (प्रतिमा- शटरस्टॉक)