आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन फीचर घेऊन येत असते. मात्र, काही गोष्टींची अजूनही त्यात कमतरता पाहायला मिळते.
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन अनुभव देण्यासाठी अॅप सतत अपग्रेड करत आहे. कंपनीने काही काळापूर्वी डिलीट फॉर एव्हरीवन हा पर्याय जारी केला होता.
व्हॉट्सअॅपमध्ये सध्या डिलीट केलेले मॅसेज वाचण्यासाठी कोणतेही इन-बिल्ट फीचर नाही. तुम्हाला WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे असल्यास, तुम्ही WhatisRemoved+, Notisave आणि WAMR सारख्या थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन्सद्वारे हे करू शकता.
Google Play Store वरून हे थर्ड-पार्टी अॅप्स डाउनलोड करा. इन्स्टॉलेशननंतर तुम्हाला अॅपच्या अटी आणि शर्ती स्वीकाराव्या लागतील आणि ते फोनवरील सूचना, मीडिया आणि फाइल्स वाचण्यासाठी आवश्यक प्रवेश अॅक्सेस द्यावा लागेल.
आता जेव्हा कोणी तुम्हाला मेसेज पाठवेल आणि तो डिलीट करेल, तेव्हा हे अॅप त्या सूचना सेव्ह करेल. येथून तुम्ही डिलीट केलेले मेसेज सहज वाचू शकाल.