WhatsApp चा अॅक्सेस चुकून दुसऱ्याच्या हातात गेला, तर तुमचं अकाउंट वापरलं जाऊ शकतं. हे शक्यतो WhatsApp Web द्वारे केलं जातं. व्हॉट्सअॅप वेबसाठी अनेक थर्ड पार्टी अॅप आहेत, जे मोबाईलवर व्हॉट्सअॅप वेबचा अॅक्सेस घेऊ शकतात.
त्यामुळे वेळोवेळी आपल्या मोबाईल फोनवरुन व्हॉट्सअॅपमध्ये वेब सेशन लॉगआउट करणं गरजेचं आहे. त्यासाठी WhatsApp Web/ Desktop वर टॅप करा. इथे तुम्ही जिथून लॉगइन केलं ते सेशन दिसेल.
इथे WhatsApp Web तुम्ही लॉगइन केलं नाही असं वाटत असेल, तर इतर कोणी ते वापरत असल्याची शक्यता असू शकते. तेथून अकाउंट लॉगआउट करा.
इथे कोणत्या ब्राउजरमध्ये व्हॉट्सअॅप ओपन केलं आहे, ते दिसतं. लॉगआउट केल्याने, जिथे व्हॉट्सअॅप लॉगइन असेल, तिथून ते लॉगआउट होईल.