NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Tata लव्हर्सना लॉटरी! ‘या’ 5 कारवर मिळतोय तगडा डिस्काउंट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

Tata लव्हर्सना लॉटरी! ‘या’ 5 कारवर मिळतोय तगडा डिस्काउंट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

Tata Cars Discount offer: सणासुदीच्या काळात टाटानं आपल्या ग्राहकांसाठी एक खास गिफ्ट दिलं आहे. नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या निमित्तानं टाटा आपल्या वाहनांवर भरघोस सूट देत आहे. परंतु ही सूट टाटाच्या सर्व वाहनांवर उपलब्ध नाही. ही सवलत टाटाच्या 5 वाहनांवर उपलब्ध आहे, परंतु टाटाच्या लोकप्रिय कारवर ही सूट उपलब्ध आहे. टाटा हॅरियर, नेक्सॉन, सफारी, टियागो आणि टिगोर यांवर सवलती मिळत आहेत. या वाहनांच्या खरेदीवर तुम्हाला 40 हजारांपर्यंत सूट मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट आहे...

15

टाटाची सर्वाधिक लोकप्रिय कार आणि जवळपास 8 महिन्यांपासून सर्वाधिक विकली जाणारी SUV टाटा नेक्सॉनवर 20 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. नेक्सॉन डिझेलबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीनं 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देऊ केली आहे. त्याचवेळी पेट्रोल व्हेरियंटवर 3 हजारांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.

25

टाटाच्या मध्यम आकाराच्या सेडान टिगोरवर 23 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. XE आणि XM प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे XZ आणि XZ Plus वर दहा हजारांची रोख, दहा हजारांचा एक्सचेंज बोनस आणि तीन हजारांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

35

कंपनीच्या हॅचबॅक टियागोवर 23 हजारांपर्यंत सूटही देण्यात आली आहे. Tigor प्रमाणे, या हॅचबॅकच्या XE आणि XT प्रकारांना 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनस व्यतिरिक्त, Tiago च्या XZ प्रकारावर 10,000 रुपयांची रोख सूट देखील दिली जात आहे.

45

कंपनी टाटाच्या प्रीमियम एसयूव्ही हॅरियरवर 40 हजारांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये रोख, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.69 लाख ते 22.04 लाख रुपये आहे.

55

टाटाने सफारीवरही सवलत देऊ केली आहे, जी भारतात लाँच केलेली एक दमदार SUV आहे. सफारीमध्ये टियागो प्रमाणे रोख, कॉर्पोरेट आणि 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहे. सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.34 लाख ते 23.5 लाख रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :