NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Online Shopping वेळी फ्रॉड झालाय? अशी करा तक्रार

Online Shopping वेळी फ्रॉड झालाय? अशी करा तक्रार

कोरोना, लॉकडाउन काळात ऑनलाईन शॉपिंगमध्ये (Online Shopping) मोठी वाढ झाली आहे. कोणतीही वस्तू घेताना अनेक जण ऑनलाईन साईट्सवर सर्च करतात आणि लगेच ऑर्डरही करतात. कुठेही न फिरता घरबसल्या हवी ती वस्तू मिळते, शिवाय अनेक पर्यायही एका क्लिकवर पाहता येतात. परंतु ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. फसवणुकीबाबत ग्राहक तक्रारही करू शकतात.

14

अनेकदा ऑनलाईन शॉपिंग साईट राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनशी (Consumer Helpline) जोडलेली नसते. अशावेळी ग्राहक कंज्युमर हेल्पलाइनला फोन करून तक्रार करू शकतात.

24

ग्राहक जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक आयोग किंवा राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकतात. याशिवाय consumerhelpline.gov.in या वेबसाईटवरही ऑनलाईन तक्रार करू शकता.

34

तसंच 14404 आणि 1800-11-4000 या टोल फ्री नंबरवर फोन करूनही तक्रार दाखल करता येते. 8130009809 या नंबरवर SMS करून देखील ग्राहकाला तक्रार करता येते. SMS मिळाल्यानंतर ग्राहकाला फोन येतो आणि तक्रारीबद्दल माहिती विचारली जाते. ग्राहकाच्या माहितीनंतर तक्रार दाखल करून घेतली जाते.

44

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास, ग्राहक या हेल्पलाइनवर तक्रार करू शकतात. केवळ ऑनलाईनचं नाही, तर इतर कोणत्याही प्रकारच्या खरेदीवेळी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यास, हेल्पलाईनवर संपर्क करता येतो.

  • FIRST PUBLISHED :