वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं अनेकजण हैराण होतात.
कामात व्यस्त असताना असे कॉल आल्यामुळं अनेकांची चिडचिडही होते.
परंतु या स्पॅम कॉल्सपासून आपण वाचू शकतो. त्यासाठी काय करावं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता.
डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडी सर्व्हिसचाही तुम्ही वापर करू शकता.
तुम्ही एसएमएसमध्ये मोबाइल नंबर आणि DND लिहून कंपनीला पाठवू शकता.
तुम्ही ट्रायमध्ये (Telecom Regulatory Authority of India) देखील तक्रार दाखल करू शकता.